मुंबई : कृषि उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सुरु असलेल्या संपाबाबत तोडगा काढण्यासाठी महत्वपूर्ण बैठक मंत्रालयात सुरू झालीय.
फळे, भाजीपाला, कांदा बटाटा बाजार समित्यांमधून नियमनमुक्त करण्यावरुन वाद निर्माण झाला. यामधून बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांनी बंदचे हत्यार उपसलं. यावर आजच्या बैठकीत तोडगा काढला जाणार आहे.
या बैठकीला पणनमंत्री, पणन राज्यमंत्री यांच्यासह सबंधित खात्यांचे सचिव तसचं बाजार समित्यांचे प्रतिनिधि, व्यापारी प्रतिनिधि, शेतकरी, अड़ते, माथाड़ी कामगार प्रतिनिधि हजर रहाणार आहेत. दरम्यान व्यापा-यांचा तिस-या दिवशी संप सुरूच आहे.