पश्चिम रेल्वेच्या मदतीला 'बेस्ट' धावली

अंधेरी-विलेपार्ले दरम्यान पश्चिम रेल्वेच्या लोकलचे ४  डबे घसरले आहेत. यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. लोकलमधील गर्दीच्या वेळेत ही घटना घडलीय.

Updated: Sep 15, 2015, 08:35 PM IST
पश्चिम रेल्वेच्या मदतीला 'बेस्ट' धावली title=

मुंबई : मुंबईत पश्चिम रेल्वेची लोकल अंधेरी आणि विलेपार्ले दरम्यान घसरली, या कामाच्या दुरूस्तीसाठी आणखी १५ तास लागणार असल्याचं सध्या तरी सांगण्यात येत आहे, यामुळे पश्चिम रेल्वे सलग दुसऱ्या दिवशीही रखडण्याची शक्यता वाढली आहे. 

प्रवाशांच्या मदतीसाठी अंधेरी आणि विलेपार्ले दरम्यान काही विशेष बेस्ट बस सोडण्यात आल्या आहेत, अंधेरी आणि विलेपार्ले दरम्यान झालेल्या अपघातात, काही प्रवासी जखमी झाले आहेत. घाबरून प्रवाशांना गाडीच्या खाली उड्या मारल्या होत्या. त्यात काही जण जखमी झाले, त्यांच्यावर कुपर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. (5 :17 PM)

दुपारी ४ वाजता  : 

गेल्या चार तासांपासून पश्चिम रेल्वे मार्गावर गोंधळ सुरू आहे. हे काम रात्रीपर्यंत पूर्ण होणार असून वाहतूक रात्री उशीरापर्यंत पूर्ववत होण्याची शक्यता आहे. वाढलेल्या तपमानामुळे हा अपघात घडल्याचं सांगण्यात येतंय. 

ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल
पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
अप - डाऊन मार्गावर जलद वाहतूक ठप्प
जलद मार्गावरची वाहतूक धीम्या मार्गावर वळवली

पश्चिम रेल्वेच्या मदतीला 'बेस्ट' धावली
अंधेरी विलेपार्लेदरम्यान १५ गाड्या सोडणार
गरज पडल्यास आणखीन बसेस सोडणार

मुंबई : अंधेरी-विलेपार्ले दरम्यान लोकलचे डबे घसरल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे, जलद मार्गाची वाहतूक धिम्या गतीच्या ट्रॅकवर वळवण्यात आली आहे, मात्र सायंकाळपर्यंत हे काम चालणार असल्याचं सांगण्यात येत आहे.(1.12 PM)

वाढलेल्या तापमानामुळे ही घटना घडली असल्याचा प्राथमिक अंदाज रेल्वे प्रशासनानं व्यक्त केला आहे, ट्रेन पुन्हा रूळावर सुरळीत आणण्यासाठी वेळ लागणार आहे. दुर्घटनेत चार जण जखमी झाल्याचं समजतंय. जखमींना कूपर रुग्णालयात हलवण्यात आलंय. 

हा ट्रेन घसरल्याचं सकाळचं अपडेट 

अंधेरी-विलेपार्ले दरम्यान पश्चिम रेल्वेच्या लोकलचे ४ ते ५ डबे घसरले आहेत. यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. लोकलमधील गर्दीच्या वेळेत ही घटना घडलीय.

ही लोकल विरारहून चर्चगेटकडे जात होती.ही घटना अंधेरी आणि विलेपार्ले दरम्यान घडली आहे. कुणीही जखमी झालं नसल्याचं रेल्वेकडून सांगण्यात येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.