अमिताभ बच्चन मुंबई पालिकेच्या क्षयरोग ब्रॅण्ड एम्बँसिडर

मुंबईत क्षयरोग (टीबी) रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून बिग बी अमिताभ बच्चन टीबी रोगाबाबत जनजागृती करणाराय. टीबीला मुंबईतून हद्दपार करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या विनंतीचा स्विकार करत बच्चन यांनी ब्रॅण्ड एम्बँसिडरची जबाबदारी स्विकालीय. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी बीएमसीकडून मानधन घेतलेले नाही.

Updated: Dec 13, 2014, 10:42 PM IST
अमिताभ बच्चन मुंबई पालिकेच्या क्षयरोग ब्रॅण्ड एम्बँसिडर  title=

मुंबई : मुंबईत क्षयरोग (टीबी) रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून बिग बी अमिताभ बच्चन टीबी रोगाबाबत जनजागृती करणाराय. टीबीला मुंबईतून हद्दपार करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या विनंतीचा स्विकार करत बच्चन यांनी ब्रॅण्ड एम्बँसिडरची जबाबदारी स्विकालीय. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी बीएमसीकडून मानधन घेतलेले नाही.

टीबीचे सर्वाधिक रूग्ण हे भारतात आहेत. जगातील एकूण टीबी रुग्णांपैकी सुमारे 26 टक्के रुग्ण हे भारतातील आहेत. तसंच दर तीन मिनिटाला दोन जणांचा टीबीमुळं मृत्यू होतो. भारतात सर्वाधिक म्हणजे 1 लाख 40 हजार इतकं टीबीचे रुग्ण महाराष्ट्रात आणि त्यापैकी सुमारे पन्नास हजार रुग्ण हे एकट्या मुंबईत दरवर्षी आढळतात.

मुंबईत हार्ट अँटकनंतर सर्वाधिक जणांचा मृत्यू हा टीबीमुळं होतोय. म्हणजे देशाची आर्थिक राजधानी मुंबईला टीबीचा असलेला विळखा दिवसेंदिवस घट्ट होताना दिसतोय. टीबी रोखण्यासाठी जनजागृतीची असणारी गरज ओळखून महानायक अमिताभ बच्चन मुंबई महापालिकेच्या मदतीला धावलाय. जाहिरातींच्या माध्यमातून टीबी संदर्भातील माहिती ते मुंबईकरांना सांगणारेत. यासाठी त्यांनी मुंबई महापालिकेकडून कुठलेही मानधन घेतलेले नाही.

टीबी जनजागृतीसाठी बीग बीच्या जाहीरातींचे शुटींगही झाले असून 21 डिसेंबरला मुख्यमंत्री आणि अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत जाहीराती लॉन्च केल्या जाणारेत. यापूर्वी बीग बीनं पोलिओ निर्मूलनाच्या जाहीरातीतून जनतेला संदेश दिला होता. आता ते टीबी रोखण्यासाठी संदेश देणारेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.