अंबाबाईच्या शालूचा लिलावच झाला नाही

कोल्हापूरच्या अंबाबाईच्या शालूचा लिलावच झाला नाही. शालूची किंमत जास्त लावल्यामुळं या शालूचा लिलावच झाला नसल्याचं पुढं आलंय. शालूची बोली 5 लाखांपासून सुरू करण्यात आली. त्यामुळं कुणीही भक्त बोली लावण्यासाठी पुढं आला नाही. यामुळं मात्र भक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

Updated: Dec 8, 2015, 08:33 PM IST
अंबाबाईच्या शालूचा लिलावच झाला नाही title=

कोल्हापूर : कोल्हापूरच्या अंबाबाईच्या शालूचा लिलावच झाला नाही. शालूची किंमत जास्त लावल्यामुळं या शालूचा लिलावच झाला नसल्याचं पुढं आलंय. शालूची बोली 5 लाखांपासून सुरू करण्यात आली. त्यामुळं कुणीही भक्त बोली लावण्यासाठी पुढं आला नाही. यामुळं मात्र भक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

शालूची एवढी किंमत कशासाठी लावली असा सवालही भक्तांनी केला आहे. तिरूपती देवस्थानकडून अंबाबाईला हा शालू अर्पण करण्यात आला होता. त्याच्या लिलाव करण्यात येणार होता पण सुरुवातीलाच येवढी मोठी बोली लावल्याने भक्त नाराज झाले.

पाहा व्हिडिओ

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.