मुंबईत दहशतवादी हल्ल्याची पुन्हा धमकी

मुंबईसह देशातल्या प्रमुख शहराला पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याची भीती निर्माण झालीय. अल जिहाद या संघटनेनं पश्चिम नौदलाच्या मुख्यालयाला धमकीचं पत्र पाठवलंय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 6, 2013, 03:30 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईसह देशातल्या प्रमुख शहराला पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याची भीती निर्माण झालीय. अल जिहाद या संघटनेनं पश्चिम नौदलाच्या मुख्यालयाला धमकीचं पत्र पाठवलंय.
२१ जुलै या दिवशी मुंबईच्या सीएसटी रेल्वे स्थानकात बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आलीय.त्याचबरोबर मुंबई आणि कोलकातामधील अमेरिकी दुतावासालाही लक्ष्य करणार असल्याचा दावा या संघटनेनं पाठवलेल्या धमकीपत्रात देण्यात आलाय.

मुंबई, कोलकाता दिल्ली, बंगळूरु आणि हैदराबाद शहरातल्या सार्वजनिक ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याची धमकी या पत्रात अल जिहादनं दिलीय.

मुंबईतील रेल्वे स्थानकं उडवून देऊ, असं धमकी देणारं निनावी पत्र मुंबईच्या पश्चिम नौदलाच्या मुख्यालयाला मिळालं आहे. येत्या २१ जुलैपूर्वी हा हल्ला करण्यात येणार असल्याचं या पत्रात म्हटलं आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आलेय. दरम्यान, डेव्हिड कोलमन हेडलीनेही यापूर्वी या ठिकाणांचा उल्लेख केला होता. त्यामुळे या घटनेकडे गांभिर्याने पाहिलं जात आहे.