मरणाने सुटका केली! अरुणा शानबाग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

गेली ४२ वर्षे कोमामध्ये असलेल्या अरूणा शानबागचा आज अखेर मृत्यू झाला. तिच्या पार्थिवावर भोईवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. डीन डॉ. अविनाश सुपे आणि अरूणाच्या भाच्यानं पार्थिवाला मुखाग्नी दिला.

Updated: May 18, 2015, 11:08 PM IST
मरणाने सुटका केली! अरुणा शानबाग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार title=
सौजन्य: दीपक साळवी ट्विटर

मुंबई: गेली ४२ वर्षे कोमामध्ये असलेल्या अरूणा शानबागचा आज अखेर मृत्यू झाला. केईएम हॉस्पिटलमध्ये सिस्टर अरूणानं शेवटचा श्वास घेतला. तिच्या पार्थिवावर भोईवाडा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. डीन डॉ. अविनाश सुपे आणि अरूणाच्या भाच्यानं पार्थिवाला मुखाग्नी दिला.

नातं केईएम आणि अरुणाचं... 

केईएममधल्या नर्सेस आणि डॉक्टरांनी तब्बल ४२ वर्षं अरूणा शानबागची आपुलकीनं काळजी घेतली. सिस्टर अरूणा शानबाग आणि केईएम हॉस्पिटल हे नातं नेमकं कसं होतं. 

'देवानं तिला मुक्ती दिली, तिची आठवण काढून रडणारं कुणी नव्हतंच...' सिस्टर अरूणा शानबागच्या मृत्यूनंतर केईएमच्या माजी डीन प्रज्ञा पै यांनी व्यक्त केलेली ही बोलकी प्रतिक्रिया... केईएम हॉस्पिटल आणि अरूणा शानबाग हे नातंच वेगळं होतं. कोमात असलेल्या सिस्टर अरूणावर केईएममधल्या नर्सेस आणि डॉक्टरांनी जीवापाड प्रेम केलं. तिची काळजी घेतली.

अरूणाच्या कर्नाटकातल्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्नही झाला. पण नातेवाईक काही अरूणाला भेटायला आले नाहीत. अरूणाच्या मृत्यूनं डॉ. प्रज्ञा पै यांची एक इच्छा मात्र अधुरीच राहिली... ही इच्छा म्हणजे व्हिलचेअरवरून हॉस्पिटलमध्ये फिरण्याची... 

सिस्टर अरूणाची केईएमच्या नर्सेस आणि कर्मचाऱ्यांनी जी सेवा केली, त्याला तोड नाही... मात्र आता अरूणाच हे जग कायमचं सोडून गेल्यानं केईएमशी जुळलेले तिचे ऋणानुबंधही कायमचे तुटलेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.