‘कॅम्पाकोला’चे अनधिकृत मजले आज पडणार नाहीत

सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयानुसार, आज ‘कॅम्पाकोला’च्या अनधिकृत मजल्यांवर मुंबई मुंबई महापालिकेचा हातोडा पडतोय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 12, 2013, 02:21 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयानुसार, आज ‘कॅम्पाकोला’च्या अनधिकृत मजल्यांवर मुंबई मुंबई महापालिकेचा हातोडा पडणार, असं सगळ्यांनाच वाटत असताना मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी 'आज केवळ मार्किंगचं काम होणार आहे... बांधकाम मात्र आज पडणार नाही' असं स्पष्ट केलंय.
मंगळवारी सकाळीच, मुंबई महानगरपालिकेचं अनधिकृत बांधकामविरोधी पथक ‘कॅम्पाकोला’मध्ये दाखल झालं. कॅम्पाकोला परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. परिसराच्या बाहेर वाहतूक ठप्प होण्याची शक्यता असल्यानं वाहतूक पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. महिला पोलिसांचा ताफाही इथं सज्ज झाला. आणि दुसरीकडे, मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतरही त्यांनी हस्तक्षेपास दिलेल्या नकारानं रहिवासी स्वत:च आपलं घर वाचविण्यासाठी सज्ज झाले. त्यामुळे या परिसराला युद्धभूमीचं स्वरुप प्राप्त झालं होतं. कारवाईत अडथळा आणण्यासाठी कॅम्पाकोलाच्या रहिवाशांनी गाड्या लावून केला रस्ता ब्लॉक केला होता. तसंच गेटच्या आतील भागात मानवी भिंग बनवून कारवाई करण्यास सरसावलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांनी गेटवरच रोखलं.
घरं खाली करण्याची मूदत संपल्यानंतरही आपला तीव्र विरोध दाखवत रहिवाशांनी घरं सोडण्यास नकार दिलाय. तण्याची तयारी रहिवाशांनी केलीय. पहिल्यांदा या इमारतीचं मूलभूत सुविधा वीज आणि पाणी कनेक्शन्स टप्प्याटप्यानं तोडण्यात येईल. दरम्यान, कारवाईत अडथळा आणणाऱ्या काही रहिवाशांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.