भरधाव वेगानं येणाऱ्या गाडीनं ५ लोकांना उडवलं!

‘बड्या बापाचा बिगडा हुआ बेटा’नं मुंबईत पुन्हा एकदा वेगानं गाडी चालवून निष्पाप लोकांना उडवलंय. अंधेरी परिसरात एका भरधाव गाडीखाली पाच जणांना चिरडल्याचा प्रकार समोर आला आहे. अंधेरीतील चिनॉय महाविद्यालय या भागात ही घटना घडली आहे. वीस वर्षीय युवकाकडून हा अपघात घडला आहे.

Updated: Nov 16, 2014, 09:16 AM IST
भरधाव वेगानं येणाऱ्या गाडीनं ५ लोकांना उडवलं! title=

मुंबई: ‘बड्या बापाचा बिगडा हुआ बेटा’नं मुंबईत पुन्हा एकदा वेगानं गाडी चालवून निष्पाप लोकांना उडवलंय. अंधेरी परिसरात एका भरधाव गाडीखाली पाच जणांना चिरडल्याचा प्रकार समोर आला आहे. अंधेरीतील चिनॉय महाविद्यालय या भागात ही घटना घडली आहे. वीस वर्षीय युवकाकडून हा अपघात घडला आहे.

विजय चड्डा असं या वाहन चालवणाऱ्या युवकाचं नाव आहे. पोलिसांनी वीस वर्षाच्या विजयला अटक केली आहे. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडलाय फोक्सव्हॅगन पोलो ही आलिशान गाडी घेऊन भरधाव वेगानं जात असतांना हा अपघात घडलाय. 

दरम्यान, अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींवर कुपर रुग्णालात उपचार सुरू आहेत. मात्र या अपघातात जखमी झालेल्यांना नक्की मार लागला आहे याबाबतची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.