चालता-बोलता 'सिनेमा' गेला!

सिनेमाचा चालता बोलता एन्सायक्लोपिडिया असी ज्यांची ख्याती होती त्या ज्येष्ठ सिनेपत्रकार आणि समीक्षक इसाक मुजावर यांचं आज निधन झालं. 

Updated: Feb 26, 2015, 07:18 PM IST
चालता-बोलता 'सिनेमा' गेला! title=

मुंबई  : सिनेमाचा चालता बोलता एन्सायक्लोपिडिया असी ज्यांची ख्याती होती त्या ज्येष्ठ सिनेपत्रकार आणि समीक्षक इसाक मुजावर यांचं आज निधन झालं. 

नेरूळ इथे राहत्या घरी वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालंय. मुजावर यांच्या निधनाने सिनेसृष्टीचा चालताबोलता ज्ञानकोष हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. 

इसाक मुजावर मुळचे नाशिकचे... १९७८ ला अनेकांप्रमाणे तेही मुंबईला आले आणि इथंच स्थाईक झाले. सुरुवातीला त्यांनी 'चित्रांद' नावाच्या साप्ताहिकात लिखाण सुरू केलं. यावेळी, ते डोंबिवलीला राहत होते. 

सिनेसृष्टीतील न ऐकलेले, न पाहिलेले अनेक किस्से त्यांच्याकडून हमखास ऐकायला मिळत. गेल्याच वर्षी चित्रपट महामंडळाचा चित्रभूषण पुरस्कार देऊन मुजावर यांचा गौरव केला होता. 

मराठी चित्रपटसृष्टीनं १०० वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्तानं त्यांनी लिहिलेलं 'गाथा मराठी सिनेमाची' हे जवळपास १००० पानांचं  पुस्तक बरंच गाजलं. 

मुजावर यांनी गाथा मराठी सिनेमाची नावाने लिहीलेलं पुस्तक खुपच गाजलं.. त्याशिवाय मुजावर यांची जवळपास ३० पुस्तकंही लोकप्रिय झाली.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.