www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
तब्बल चार कोटी रुपयांच्या ‘एस्टन मार्टिन’ कारने केलेल्या अपघातामुळे सध्या मोठी खळबळ उडालीय. ‘रिलायन्स पोर्ट’च्या नावाने रजिस्टर्ड असलेली ही आलिशान कार ख्यातनाम उद्योगपती मुकेश अंबानींचे पुत्र आकाश अंबानी चालवत होते, असा खळबळजनक आरोप जखमी महिलेनं केलाय. परंतु रिलायन्सच्या प्रवक्त्याने हा आरोप चुकीचा असल्याचं सांगितलंय.
एमएच ०१ बीके ९९... चार कोटी रूपयांच्या या महागड्या कारचा हा व्हीआयपी नंबर... पण, आता मात्र या गाडीची दशा झालेली पाहायला मिळते. ७ डिसेंबरच्या रात्री एक वाजल्याच्या सुमारास महालक्ष्मी जंक्शनजवळ या चार कोटींच्या कारने एका ऑडीला जोरदार धडक दिली. त्यानंतर एका इलेंक्ट्रा मोटारीलाही मागून टक्कर दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, ऑडी कार डिव्हायडर तोडून रस्त्याच्या पलिकडे जाऊन धडकली.
या अपघाताला कारणीभूत ठरलेली ही ‘एस्टन मार्टिन’ कार आहे तरी कुणाची? रिलायन्स पोर्टच्या नावाने ही कार रजिस्टर्ड आहे. याच गाडीतून रिलायन्स उद्योगसमूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांचा पुत्र आकाश अंबानी सचिन तेंडुलकरच्या पार्टीला गेलेला दिसला होता... मात्र, अपघातादरम्यान ही कार नक्की कोण चालवत होतं? ही बाब अद्याप स्पष्ट झालेली नाही.
अपघातात जखमी झालेल्या गरीमा सिंह यांच्या म्हणण्यानुसार घटनास्थळी दाखल झालेले पोलिसांनी मदत करण्याऐवजी पुरावे नष्ट करण्याचे प्रयत्न करत होते.
आता हे प्रश्न उपस्थित होतात…
- मुकेश अंबानी परिवारातला कोणी सदस्य कार चालवत होता?
- रिलायन्स पोर्टशी निगडीत कोणी व्यक्ती कार चालवत होता?
- की कोणी तिसरी व्यक्ती घटनेच्यावेळी कार चालवत होता?
आम्हाला माहिती झालंय की कार कोणाच्या नावावर आहे. मात्र पोलिसांना कळू शकलं नाही की कार कोणाची आहे. ही बाब स्पष्ट झालंय की हे प्रकरण इतकं छोटं नाही जितक्या थंडपणे पोलीस या प्रकरणाची माहिती देताना दिसतात.
व्हिडिओ पाहा -
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.