आदेश बांदेकरांना दुधी रसाची बाधा

'होम मिनिस्टर' या झी मराठीवरील कार्यक्रमातील आदेश भावोजी अर्थात अभिनेते आदेश बांदेकर यांना दुधीच्या रसामुळे विषबाधा झाली. 

Updated: Dec 25, 2015, 08:59 AM IST
आदेश बांदेकरांना दुधी रसाची बाधा title=

मुंबई : 'होम मिनिस्टर' या झी मराठीवरील कार्यक्रमातील आदेश भावोजी अर्थात अभिनेते आदेश बांदेकर यांना दुधीच्या रसामुळे विषबाधा झाली. विषबाधा झाल्यानंतर त्यांना तात्काळ पवईच्या हिरानंदानी रुग्णालयात दाखल कऱण्यात आले. दरम्यान, त्यांची प्रकृती ठीक असल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय. 

शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे चित्रीकरणासाठी निघाले होते. याआधी त्यांनी दुधीचा रस घेतला. मात्र हा रस त्यांना चांगलाच बाधला. रस घेतल्यानंतर काही वेळातच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. 

त्यांना उलट्याही झाल्या. त्यांची प्रकृती अधिकच चिंताजनक झाल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आले. वेळीच उपचार झाल्याने आदेश यांच्यावरील धोका टळला.