भाज्यांचे दर गगणाला, गृहिणींचं बजेट कोलमडलं

जून महिना अर्धा सरला असला तरी मान्सून काहीसा लांबलाय आणि भाज्यांची आवकही कमालीची रोडावली आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागलीय. बहुतांश भाजांनी शंभरी पार केल्यामुळे गृहिणींचं बजेट पूर्णतः कोलमडलंय. 

Updated: Jun 15, 2016, 10:42 PM IST
भाज्यांचे दर गगणाला, गृहिणींचं बजेट कोलमडलं title=

मुंबई : जून महिना अर्धा सरला असला तरी मान्सून काहीसा लांबलाय आणि भाज्यांची आवकही कमालीची रोडावली आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागलीय. बहुतांश भाजांनी शंभरी पार केल्यामुळे गृहिणींचं बजेट पूर्णतः कोलमडलंय. 

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा दुपटीने ते तिपटीने भाव वाढलेत. कोथिंबीर, टोमॅटो, मेथी, गवार, दोडका कारली सर्वच भाज्या तुफान महागल्या आहेत. पावसाचा पत्ताच नसल्याने पुढील काही आठवडे भाज्यांचे दर असेच राहण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. 

नाशिक जिल्ह्यातून बहुतांश राज्याला भाजीपुरवठा होतो. नाशिकची भाजी राज्याच्या बाहेरही जाते. मात्र यावर्षी नाशिक जिल्ह्याने प्रचंड मोठा दुष्काळ सहन केलाय. त्यामुळे नाशिकमधलं भाजीपाल्याचं उत्पादन कमालीचं घटलंय. त्यामुळे घाऊक बाजारात दर कमालीचे चढे आहेत. 
 
कोथिंबीर जुडी ४० रुपये, टोमॅटो ८० ते ९० रुपये, गवार ७० ते ८० रुपये, मेथी जुडी ४० ते ५० रुपये, कारली ६० ते ७० रुपये किलो असून किरकोळचे भाव ८० ते ९०च्या घरात आहेत. त्यामुळे जेवणातील भाजी गायब झालेय.