मुंबई : तोकडे कपडे घालणाऱ्या मुलींवरच बलात्कार होतात, त्यामुळे मुलीच बलात्काराला जबाबदार असतात, अशी वादग्रस्त विधान अनेक वेळा होतात, पण ही विधानं आता खोटी ठरली आहेत, कारण मुंबई असं मेट्रो शहर आहे, जेथे मुलींनी तोकडे कपडे घातले, तरीही त्यांच्यावर लोकांच्या वाईट नजरा पडत नाहीत. हे या व्हिडीओवरून सिद्ध होतंय.
हे आपण आपल्या मुंबईबद्दल बोलतोय. हा व्हिडीओ मुंबईत शूट करण्यात आला आहे, मिनी स्कर्ट घातलेल्या या मुलीवर कुणी शेरेबाजी करतंय का, हे हा छुपा कॅमेरा टिपतोय, मात्र ही मुलगी मिनी स्कर्टवर ही मुलगी मुंबईच्या विविध भागात १० तास फिरली, या सफरीत लोकांनी तिच्यावर कोणतीही शेरेबाजी केली नाही. हा व्हिडिओ आता यू-ट्यूबवर व्हायरल होतोय.
हा व्हिडीओ बातमीच्या शेवटी पाहा, आधी मुंबईतला व्हिडीओ, त्याखाली न्यूयॉर्कचा व्हिडीओ
या व्हिडीओवरून आता असंही म्हणता येईल की, न्यूयॉर्कपेक्षाही मुंबईत महिला सुरक्षित आहेत, कारण असाच एक व्हिडीओ न्यूयॉर्कच्या मॅनहॅन्टन स्ट्रीटवर चित्रित करण्यात आला होता. न्यूयॉर्कच्या लोकांनी मॅनहॅन्टन स्ट्रीटवरून जाणाऱ्या महिलेवर अनेक अश्लील कमेन्ट केल्या होत्या, विशेष म्हणजे ही मुलगी मिनी स्कर्ट नाही तर जीन्समध्ये होती.
मुंबईत मात्र असं काहीही झालं नाही, म्हणून मुंबईकरांचा महिलांविषयीचा दृष्टीकोन किती सकारात्नक आहे, याचा विचार आता साऱ्या जगाला करावा लागणार आहे, एवढंच नाही तर तो आचरणात आणण्याचाही प्रयत्न करावा लागणार आहे.
सर्वात आधी मुंबईचा व्हिडीओ, त्या खाली न्यूयॉर्कचा मॅनहंटन स्ट्रीटचा व्हिडीओ
न्यू यॉर्कचा व्हिडीओ
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.