माझ्या मुलीला सुरक्षेची गरज नाही – फडणवीस

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पदभार स्वीकारल्यानंतर तात्काळ झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आलीय. पण, ही सुरक्षा घेण्यास फडणवीस यांनी नकार दिलाय. 

Updated: Nov 11, 2014, 11:44 AM IST
माझ्या मुलीला सुरक्षेची गरज नाही – फडणवीस title=

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पदभार स्वीकारल्यानंतर तात्काळ झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आलीय. पण, ही सुरक्षा घेण्यास फडणवीस यांनी नकार दिलाय. 

झेड प्लस सुरक्षा हटवून त्याऐवजी वाय सुरक्षा देण्याची मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलीय. याशिवाय, आपली मुलगी दिविजा हिला सुरक्षेची गरज नाही, असंही फडणवीस यांनी म्हटलंय. गृह विभागाला लिहिलेल्या पत्रात फडणवीस यांनी त्यांना प्रदान करण्यात आलेल्या सुरक्षेत काटछाट करण्याच्या सूचना दिल्यात. 

सध्यातरी, गृहमंत्रालय हे मुख्यमंत्र्यांकडेच आहे. आता मंत्रालय त्यांच्या या मागणीवर निर्णय घेणार आहे.  

फडणवीस यांनी स्पेशल विमानातून नागपूरला जाण्यासही नकार दिलाय.दरम्यान मुख्यमंत्र्याना कोणती सुरक्षा पुरवावी याचा निर्णय घेण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली एक सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ३१ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राचे १८ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. फडणवीस हे या पदावरील भाजपचे पहिलेच नेते ठरलेत. 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.