ओशिवर्‍यात ३० कोटींचा ‘म्याव म्याव’ पकडला

एमडी म्हणजेच ‘म्याव म्याव’ या अमली पदार्थाचा तब्बल १५१ किलो इतका मोठा साठा एटीएसच्या चारकोप युनिटने ओशिवरा येथे पकडला. एका थ्री बिएचके फ्लॅटमध्ये यांची कंपनीच खोलण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. जप्त करण्यात आलेला एमडीचा साठा प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. याची किंमत ३० कोटी रुपये आहे.

Updated: Jul 1, 2015, 09:13 AM IST
ओशिवर्‍यात ३० कोटींचा ‘म्याव म्याव’ पकडला title=
संग्रहीत

मुंबई : एमडी म्हणजेच ‘म्याव म्याव’ या अमली पदार्थाचा तब्बल १५१ किलो इतका मोठा साठा एटीएसच्या चारकोप युनिटने ओशिवरा येथे पकडला. एका थ्री बिएचके फ्लॅटमध्ये यांची कंपनीच खोलण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. जप्त करण्यात आलेला एमडीचा साठा प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. याची किंमत ३० कोटी रुपये आहे.

जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची किंमत ३० कोटी इतकी असून पोलिसांनी एमडी तयार करण्यासाठी लागणारा कच्चा मालदेखील जप्त केला आहे. हा एमडीचा साठा मुंबईत विकण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना पोलिसांनी अटक केली. ओशिवरा येथील एकदंत इमारतीच्या फ्लॅट क्र. ५०३ तसेच श्रीजी हॉटेल जंक्शन येथे चार इसम एमडीचा साठा घेऊन विक्रीसाठी येणार असल्याची खबर एटीएसच्या चारकोप युनिटला मिळाली होती. त्यानुसार सापळा रचण्यात आला. 

पोलिसांनी सचिन बागूल (२९), साजीद युसूफ इलेक्ट्रिकवाला (४१), चंद्रकांत काताडे (३२) आणि राहुल साळुंखे (२८) या चौघांना पकडले. या चौघांना १० जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

‘एमडी’ची फॅक्टरी
समुद्राचे खारे पाणी आटवून मिठागरांमध्ये मीठ बनवितात. त्याचप्रमाणे ओशिवरा येथील एका तीन बीएचके फ्लॅटमध्ये कच्ची पावडर आणि त्यात रसायन आटवून ‘एमडी’ हा अमली पदार्थ तयार केला जात होता. पण एटीएसच्या चारकोप युनिटच्या अधिकार्‍यांनी या फ्लटमध्ये छापा टाकून तस्करांचे हे ‘एमडीगर’ उद्धवस्त केले.

ओशिवरा येथेल एकदंत इमारतीमधील ५०३ क्रमांकाचा फ्लॅट सचिन, साजीद, चंद्रकांत, राहुल यांनी भाड्याने घेतला होता. या फ्लॅटमध्ये ‘एमडी’ हा अमलीपदार्थ बनविण्यासाठी लागणारी कच्ची पावडर आणि रसायन तसेच इतर साहित्य ठेवण्यात आले होते. कच्ची पावडर आणि रसायन मिक्स करून ते आटविण्यासाठी छोट्या छोट्या ट्रेमध्ये भरून ठेवले होते. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी फ्लॅटचे वातावरण थंड राहण्यासाठी या चौघांनी तब्बल सहा एसी बसविले होते. एमडी बनविण्याची प्रक्रिया सुरू असतानाच एटीएसच्या अधिकार्‍यांनी या फ्लॅटमध्ये छापा टाकला. 

हे चौघे तयार एमडी कशाप्रकारे वितरीत करणार होते. तस्करांच्या या साखळीमध्ये कोणाकोणाचा समावेश आहे हे तपासातून स्पष्ट होईल, असे एटीएसच्या अधिकार्‍यांनी म्हटले आहे. पोलिसांच्या धडक मोहिमेमुळे एमडी ड्रग्ज बाहेरून मुंबईत आणणे धोकादायक असल्याने हे चौघे फ्लॅटमध्ये एमडी त्यात करायचे, अशी माहिती पुढे आली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.