मुंबई : मुंबई आणि उपनगर परिसरामध्ये पहाटेपासून धोधो पाऊस पडत असला तरी, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची पातळी निम्मेपेक्षा खाली गेला आहे.
मुंबईत यावरून 20 टक्के पाणीकपातीचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.
जून महिना अख्खा कोरडा गेल्यामुळे धरणांची पातळी खालावली आहे.
जून महिन्यात अपेक्षित असलेला पाऊस बरसलाच नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.
मुंबईत पाणीकपात होवू नये यासाठी धरण परिसरात चांगला पाऊस होणे अपेक्षित आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.