संपकरी डॉक्टरांना मेस्माअंतर्गत नोटीस, एक बळी

 संपावर गेलेल्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची तयारी सरकारनं सुरु केलीय. या डॉक्टरांना मेस्मा अंतर्गत नोटीस बजावण्यात आलीय. मंगळवारपासून राज्यातल्या सार्वजनिक विभागातले 12 हजार डॉक्टर संपावर गेलेत. त्यामुळे रुग्णांचे हाल सुरु आहेत. दरम्यान, या संपाचा एक बळी गेलाय.

Updated: Jul 2, 2014, 03:19 PM IST
संपकरी डॉक्टरांना मेस्माअंतर्गत नोटीस, एक बळी title=
रत्नागिरीत आंदोलन करताना डॉक्टर

मुंबई : संपावर गेलेल्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची तयारी सरकारनं सुरु केलीय. या डॉक्टरांना मेस्मा अंतर्गत नोटीस बजावण्यात आलीय. मंगळवारपासून राज्यातल्या सार्वजनिक विभागातले 12 हजार डॉक्टर संपावर गेलेत. त्यामुळे रुग्णांचे हाल सुरु आहेत. दरम्यान, या संपाचा एक बळी गेलाय.

मार्डच्या संपाचा पहिला बळी जळगाव जिल्ह्यातील रावेरमध्ये ठरलाय. कल्पेश महाजन विजेचा धक्का बसून गंभीर जखमी झाला. ग्रामीण रुग्णालयात उपचार मिळाले नाहीत. वैद्यकीय अधिकारी बी. बी. बारेला हजर नसल्याने संतप्त जमावाने रुग्णालयाच्या दिशेन जोरदार दगडफेक केली तसच साहित्याची तोडफोड केलीय.

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्याने राज्यातील १२ हजार सरकारी डॉक्टरांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरु केले आहेत. शासनस्तरावर निर्णय झाला नाही तर सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा डॉक्टरांच्या महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेनं (मंग्मो) दिलाय. गेली चार वर्षे डॉक्टरांची 'मग्मो' संघटना मागण्यांसाठी पाठपुरावा करीत आहे.

शासनाच्या सेवेत समावेश न करण्यात आलेल्या सन २००९ आणि २०१० सालच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना लाभ द्यावेत, डॉक्टरांचे कामाचे तास निश्चित करून निवृत्ती वय ५८ वरून ६२ करावे, बीएएमएस वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदोन्नत्ती मार्गी लावणे, वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांना रखडलेल्या वेतनवाढीचा लाभ द्यावा या मागण्यांसाठी २ जून रोजी मुख्यमंत्र्याबरोबर झालेल्या बैठकीत निर्णय घेतला होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.