सावध राहा.. स्वाइन फ्लू मुंबईत आलाय...

दोनच वर्षापूर्वी स्वाइन फ्लूने मुंबईत चांगलेच थैंमान घातले होते. मुंबईकरांना या स्वाइन फ्लूने चांगलेच घाबरवून सोडले होते. आता पुन्हा एकदा स्वाइन फ्लू मुंबईत हळूहळू पसरतो आहे.

Updated: Jul 27, 2012, 11:29 AM IST

www.24taas.com, मुंबई

दोनच वर्षापूर्वी स्वाइन फ्लूने मुंबईत चांगलेच थैंमान घातले होते. मुंबईकरांना या स्वाइन फ्लूने चांगलेच घाबरवून सोडले होते. आता पुन्हा एकदा  स्वाइन फ्लू मुंबईत हळूहळू पसरतो आहे.

स्वाइन फ्लूचे ११० आणि मलेरियाचे १ हजार रुग्ण मुंबईत आढळले असले तरी पावसाळ्यात उद्भवणारे मुंबईतील साथींचे आजार पूर्णपणे आटोक्यात असल्याची माहिती पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांनी दिली आहे. मनीषा म्हैसकर म्हणाल्या की, मुंबईतील काही स्वयंसेवी संस्था साथींच्या आजारांबाबत चुकीची आकडेवारी देऊन नागरिकांची  दिशाभूल करत आहेत.

स्वयंसेवी संस्थांच्या या माहितीवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. पालिकेच्या वतीने साथींच्या आजारांबाबत पूर्णपणे दक्षता घेतली जात आहे. मागच्या वर्षी जुलै महिन्यामध्ये मुंबईत मलेरियाची २० हजार नागरिकांना लागण झाली होती.