रुपया सावरला

रुपयाच्या विक्रमी घसरणीनंतर रिझर्व बँकेने केलेल्या हस्तक्षेपामुळे या घसरणीला चाप लागला असून शुक्रवारी सकाळी बाजार सुरू होताच, रुपयाच्या किमतीत ७४ पैशांची वाढ झाली.

Updated: Dec 16, 2011, 10:18 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

रुपयाच्या विक्रमी घसरणीनंतर रिझर्व बँकेने केलेल्या हस्तक्षेपामुळे या घसरणीला चाप लागला असून शुक्रवारी सकाळी बाजार सुरू होताच, रुपयाच्या किमतीत ७४ पैशांची वाढ झाली.

एका डॉलरची किमत ५२ रुपये ९० पैसे झाली आहे. परदेशी संस्थात्मक गुंतवणुकदार तसेच व्यापा-यांकडून भारतीय चलनात होणा-या वायदेबाजारातील व्यवहारामुळे ही घसरण होत होती. त्यामुळे रिझर्व बँकेने या वायदेबाजारावर बंधने घातली आहेत. रिझर्व बँक शुक्रवारी पतधोरण जाहीर करणार आहे. त्याचाही परिणाम रुपयावर झाल्याचे बोलले जाते.

एका डॉलरची किंमत ५४ रुपये २२ पैसे इतकी झाली होती. दोन दिवसांपूर्वी बाजार उघडताच रुपयाचे अवमूल्यन होण्यास सुरुवात झाली आणि रुपयाने आतापर्यंतचा निचांक नोंदवला.