www.24taas.com,मुंबई
रायगडमधील दिवेआगर दरोडाप्रकरणी विधानसभेत महाआरती करणा-या १४ आमदारांचं निलंबन अखेर मागे घेण्यात आलय. ३० मार्चला शिवसेनेच्या १३आणि भाजपच्या एका आमदाराचं याप्रकरणी एका वर्षासाठी निलंबन करण्यात आले होते.
या आमदारांनी पुन्हा असे वर्तन होणार नसल्याचे आश्वासन दिल्याने एक वर्षासाठी करण्यात आलेले निलंबन मागे घेत असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. यात शिवसेनेच्या एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक, विजय शिवतारे, विनोद घोसाळकर, महादेव बाबर, राजन विचारे, ज्ञानराज चौगुले, संजय गावंडे, बालाजी किणीकर, अभिजीत आडसूळ, चंद्रकांत मोकाटे, दौलत दरोडा, सुजीत मिंचेकर या १३ आमदारांसह भाजपच्या राम शिंदे यांचा समावेश होता. एक वर्षांचं निलबंन ही खूप कठोर शिक्षा असल्यानं, ही शिक्षा रद्द करावी अशी मागणी सर्वच विरोधकांनी केली होती.
दिवेआगार येथील चोरीला गेलेल्या सुवर्णगणेश मूर्तीप्रकरणी राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी थेट सभागृहातच गणपतीची मूर्ती आणून त्याची आरती करणा-या या १४ आमदारांना ३० मार्च रोजी वर्षभरासाठी निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर विरोधी पक्षाने यांचे निलंबन रद्द व्हावे म्हणून सभागृहामध्ये अनेकदा हा मुद्दा उपस्थित केला व सरकारला विनंतीही केली. त्यानंतर हे निलंबन मागे घेण्यात आले.
व्हिडिओ पाहा.
[jwplayer mediaid="86952"]