मुंबईचा पाणीप्रश्न सुटणार!

मुंबईचा पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबईच्या पाणीपुरवठय़ात ४५५ दशलक्ष लीटरची वाढ करणारे मध्य वैतरणा धरण पूर्णत्वाला गेले आहे. त्यामुळे आता पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे

Updated: May 18, 2012, 08:41 AM IST
www.24taas.com, मुंबई

 

मुंबईचा पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबईच्या पाणीपुरवठय़ात ४५५ दशलक्ष लीटरची वाढ करणारे मध्य वैतरणा धरण पूर्णत्वाला गेले आहे. त्यामुळे आता पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे.

 

वैतरणा धरण  देशातले दुसर्‍या क्रमांकाचे मोठे धरण ठरले आहे. रोलर कॉम्पेक्टेड काँक्रीट रोलर (आरसीसी) पद्धतीने बांधण्यात आलेल्या महाराष्ट्रातील या पहिल्याच धरणात यंदाच्या पावसाळ्यात पाणी साठण्यास सुरुवात होईल.

 

या धरणाची वैशिष्ट्ये

१- भाकरा नांगल धरणानंतर आरसीसी पद्धतीने बांधण्यात आलेले मध्य वैतरणा हे देशातील दुसरे  धरण

२- धरणाची उंची १0२.४ मीटर आहे

३- जलदगतीने पूर्ण होणारे जगातील नववे आरसीसी धरण

४- मध्य वैतरणा प्रकल्पातून ४५५ दशलक्ष लीटर जादा पाणीपुरवठा

५- या धरणामुळे मुंबईकरांना ३८५५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होईल
-