www.24taas.com, मुंबई
मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराची मालिका सुरूच आहे. गुरूवारी इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना चुकीचा पेपर देण्यात आला. गुरूवारी दुपारी तीन ते सहा या वेळेत मायक्रो प्रोसेसर आणि मायक्रो कंट्रोलर भाग दोन या विषचाया पेपर असताना विद्यार्थ्यांना मात्र भाग एकचा पेपर देण्यात आला.
भाग एकचा पेपर येत्या 23 तारखेला होणार आहे. विद्यार्थ्यांनी पेपर हातात येताच ही चूक संबधितांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर विद्यापीठानं चूक मान्य करत दिलेले पेपर परत घेतले. भाग दोनचे पेपर विद्यार्थ्यांना साडेचार वाजता दिले आणि साडेसातपर्यंत त्यांना वेळ देण्यात आला.
मायक्रो प्रोसेसर आणि मायक्रो कंट्रोलर भाग एकचा पेपर नियोजित वेळेनुसार म्हणजेच येत्या 23 तारखेला होणार आहे. त्याची प्रश्नपत्रिकाही बदलली जाणार आहे अशी माहिती विद्यापीठातर्फ देण्यात आली आहे.