माजी आरोग्यमंत्री विमल मुंदडा यांचे निधन

महाराष्ट्राच्या माजी आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या आमदार विमल मुंदडा ( ४९) यांचे गुरूवारी रात्री मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. विमल मुंदडा या गेल्या काही महिन्यांपासून कर्करोगाने आजारी होत्या.

Updated: Mar 23, 2012, 11:54 AM IST

www.24taas.com, मुंबई

महाराष्ट्राच्या माजी आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या आमदार विमल मुंदडा ( ४९) यांचे गुरूवारी रात्री मुंबईतील  रुग्णालयात निधन झाले. विमल मुंदडा या गेल्या काही महिन्यांपासून कर्करोगाने आजारी होत्या.

मुंदडा यांनी १९९० साली भाजपातून राजकीय कारकिर्दीस सुरूवात केली. काही काळाने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारच्या काळात त्यांनी सार्वजनिक आरोग्य, महिला आणि बालकल्याण खाते सांभाळले होते.

बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुराही त्यांनी सांभाळलीय. २००८ मध्ये सार्वजनीक बांधकाम आणि विशेष उपक्रम मंत्री असताना वरळी-वांद्रे सीलिंक सारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. २००९ च्या विधानसभा निवडणूकीनंतर त्यांचं वास्तव्य मुंबईतच होतं. त्यांच्यावर चार-पाच वेळा परदेशातही उपचार करण्यात आले. त्यांच्यावर काही काळ मुंबईत तसेच अमेरिकेतही उपचार करण्यात आले होते. त्यांच्या पश्चात  पती आणि मुलगा असा परिवार आहे.