महापौरपदांसाठीची सोडत आज मंत्रालयात

राज्यातील महापालिकांच्या महापौरपदांसाठीची सोडत मंत्रालयात काढण्यात येणारयं. यापूर्वी ३३ टक्के महिला आरक्षणानुसार सोडत काढण्यात आली होती. मात्र महिलांना ५० टक्के आरक्षण लागू झाल्यानंतर महिला महापौरपदांची संख्या वाढणार असल्यानं आज मंत्रालयात नव्यानं सोडत काढली जाणार आहे.

Updated: Feb 22, 2012, 03:10 PM IST

www.24taas.com,  मुंबई

राज्यातील महापालिकांच्या महापौरपदांसाठीची सोडत मंत्रालयात काढण्यात येणारयं. यापूर्वी ३३ टक्के महिला आरक्षणानुसार सोडत काढण्यात आली होती. मात्र महिलांना ५० टक्के आरक्षण लागू झाल्यानंतर महिला महापौरपदांची संख्या वाढणार असल्यानं आज मंत्रालयात नव्यानं सोडत काढली जाणार आहे.

नुकताच पार पडलेल्या नाशिक आणि ठाणे महापालिकेचं महापौरपदर महिलांकडे असेल की पुरूषांकडे हे आजच्या सोडतीत ठरेल. या सोडतीमध्ये मुंबई, नागपूर, अहमदनगर आणि उल्हासनगर महापालिकांचं महापौरपद खुल्या सर्वसाधारण गटासाठी राखीव असेल. गेल्यावेळी या महापालिकांचं महापौरपद महिलांसाठी राखीव होतं.

आजच्या सोडतीमध्ये नाशिक, मिराभाईंदर, भिवंडी, धुळे आणि नांदेड महापालिकांमध्ये खुल्या गटातील महिला महापौर पदांच्या दोन जागांसाठी आरक्षण काढलं जाईल तर ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई महापालिकांमधून मागास प्रवर्गातील महिला महापौरपदाच्या एका जागेसाठी सोडत काढण्यात येणार आहे.

व्हिडिओ पाहा..

[jwplayer mediaid="53172"]