बिल्डरचा पोलिस एजंट, रहिवाशांशी करतोय सेटलमेंट!

एका बिल्डरधार्जिण्या एसीपीनं स्वत:च्या स्वार्थासाठी झोपडपट्टीधारकांवर दबाव आणायला सुरूवात केलीय. अनिल कराडे असं या पोलीस अधिका-याचं नाव आहे. विलेपार्ले पूर्व भागातील आंबेडकर नगर परिसरातील जागा बिल्डरला द्यावी यासाठी एजंट बनून सेटलमेंट करण्याचं काम कराडे करतोय.

Updated: Jun 18, 2012, 02:57 PM IST

www.24taas.com, मुंबई

एका बिल्डरधार्जिण्या एसीपीनं स्वत:च्या स्वार्थासाठी झोपडपट्टीधारकांवर दबाव आणायला सुरूवात केलीय. अनिल कराडे असं या पोलीस अधिका-याचं नाव आहे. विलेपार्ले पूर्व भागातील आंबेडकर नगर परिसरातील जागा बिल्डरला द्यावी यासाठी एजंट बनून सेटलमेंट करण्याचं काम कराडे करतोय.

सध्या या भागातील झोपडपट्टीधारकांना झोपडीमागे 40 लाखांचं आमिष दाखवलं जातयं. जे झोपडपट्टीधारक जागा विकायला तयार नाही त्यांना दमदाटी केली जातीय तसच ज्यांच्या झोपड्या नव्यानं उभ्या राहिल्या आहेत त्यांना 10 हजार रूपयांत रेशनकार्ड बनवून देण्याची जबाबदरीही एसीपी कराडेनं स्वीकारलीय.

डीएनचे रिपोर्टर राहुल गडपाले यांनी स्टींग ऑपरेशनकरून हे प्रकरण उघडकीस आणलयं. झी 24 तासवर याची EXCLUSIVE दृष्य आहेत. तर शिवसेनेचे माजी नगरसेवक मारूती खेडसकर यांनी थेट कुणी पैशांचं आमिष दाखवत असेल तर थेट चोप द्या किंवा त्यांना इथे घेऊन या साहेब बघून घेतील असा सल्ला दिलाय.

स्टिंग ऑपरेशनचा पाहा व्हिडिओ

[jwplayer mediaid="122803"]