www.24taas.com, मुंबई
राज्यात सर्वत्र स्त्रीभ्रूण हत्येचा प्रश्न गाजत आहे. बीडचे डॉ. मुंडे प्रकरण गाजत असताना मुंबईत पुन्हा मृतावस्थेत अर्भक सापडल्याने भ्रूण हत्येचा सुरूच असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे.याप्रकारामुळे सांताक्रूझ परिसरात खळबळ उडाली आहे.
मुंबईतील सांताक्रुझ पश्चिम येथील खोतवाडीत एका गटारात आज अर्भक मृतावस्थेत आढळून आले आहे. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा भ्रूण हत्या झाल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. पावसाच्या पाण्याने तुंबलेलं गटार साफ करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना हे अर्भक सापडले.