अण्णांचे मुलुखमैदान होतयं तयार...

MMRDA मैदान अण्णांच्या उपोषणासाठी सज्ज होत आहे. आयएसीनं उपोषणाचं स्टेज आणि इतर गोष्टींचा आराखडा बनवला आहे. अण्णांच्या प्रत्यक्ष उपोषणाची जागा, मिडीयाला दिली जाणारी जागा, उपोषणाला येणाऱ्या लोकांची बसायची जागा कशी आणि कुठे असेल याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

Updated: Dec 25, 2011, 01:56 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

अण्णांनी आपलं उपोषणाचे हत्यार पुन्हा एकदा उपसल्यापासून अण्णांच्या त्याच उपोषणाबद्दल पुन्हा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दिल्लीची बोचरी थंडी यामुळे अण्णांनी आपलं उपोषण मुंबईत करण्याचं निर्णय घेतल्याने आता MMRDA मैदान उपोषणासाठी सज्ज होत आहे.

 

MMRDA मैदान अण्णांच्या उपोषणासाठी सज्ज होत आहे. आयएसीनं उपोषणाचं स्टेज आणि इतर गोष्टींचा आराखडा बनवला आहे. अण्णांच्या प्रत्यक्ष उपोषणाची जागा, मिडीयाला दिली जाणारी जागा, उपोषणाला येणाऱ्या लोकांची बसायची जागा कशी आणि कुठे असेल याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

 

अण्णांच्या उपोषणाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतो आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात अण्णांना  समर्थन देण्यासाठी समर्थक येणार असल्याने MMRDA मैदानाची योग्य ती व्यवस्था करण्यात येत आहे.  त्यानुसार मैदानाची आखणी करण्यात आली आहे. अण्णांचं स्टेज, येणाऱ्या गाड्यांसाठी पार्किंग, लोकांची बसायची व्यवस्था आराखड्यानुसार निश्चित करण्यात आली आहे.

 

[jwplayer mediaid="18113"]