शिवसेनेत धुसफूस

अँटॉप हिलमधल्या वॉर्ड क्रमांक १६९ वरुन शिवसेनेतल्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये घमासान सुरु आहे. महापौर श्रद्धा जाधव आणि ज्येष्ठ नगरसेवक मंगेश सातमकर हे उमेदवारीसाठी दावेदार आहेत. सातमकर यांना उमेदवारी द्यावी यासाठी शिक्षकांनी मातोश्रीवर धाव घेतली.

Updated: Jan 21, 2012, 09:39 PM IST

www.24taas.com, मुंबई

अँटॉप हिलमधल्या वॉर्ड क्रमांक १६९ वरुन शिवसेनेतल्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये घमासान सुरु आहे. महापौर श्रद्धा जाधव आणि ज्येष्ठ नगरसेवक मंगेश सातमकर हे उमेदवारीसाठी दावेदार आहेत. सातमकर यांना उमेदवारी द्यावी यासाठी शिक्षकांनी मातोश्रीवर धाव घेतली.

महापालिका निवडणुकीत शिवसेनेची उमेदवारीची पहिली यादी जाहीर होण्यापुर्वीच इच्छुकांकडून दबावतंत्राचा वापर सुरु झाला. शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक मंगेश सातमकर यांचा सायनमधला वॉर्ड १६५ हा महिलांसाठी राखीव झाल्यानं त्यांना अँटॉपहील परिसरातला १६९ वॉर्ड हवा आहे. मात्र या वॉर्डमध्ये महापौर श्रद्धा जाधव यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत मिळु लागल्यानं सातमकर नाराज असल्याची चर्चा आहे.

सातमकर यांच्या समर्थनार्थ अनेक शिक्षकांची मातोश्रीवर धाव घेऊन उद्धव ठाकरे यांना वॉर्ड १६९ मधून सातमकर यांना उमेदवारी देण्याची मागणी केली.

महापौरांनी वॉर्ड १९७ मधून आपल्या मुलालाही उमेदवारी मागितल्याच्या वृत्तानं शिवसैनिक नाराज झाल्याची चर्चा होती. वॉर्ड आरक्षणानं अनेकांची कोंडी झाली. पक्ष नेतृत्वालाही तिढा सोडवताना कस लागणार आहे. त्यातुनच मग दबावतंत्राचे प्रकार घडत आहे.