इंजिन धावणार उजवीकडं, सत्तेत कोण जाणार पुढं?

यंदाच्या महापालिका निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं रेल्वे इंजिन डावीकडून उजवीकडे धावणार आहे. याआधीच्या निवडणूकीत हे रेल्वे इंजिन उजवीकडून डाव्या दिशेला धावत होतं.

Updated: Jan 21, 2012, 08:03 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

यंदाच्या महापालिका निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं रेल्वे इंजिन डावीकडून उजवीकडे धावणार आहे. याआधीच्या निवडणूकीत हे रेल्वे इंजिन उजवीकडून डाव्या दिशेला धावत होतं. याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवून विनंतीवजा मागणी केली होती.

 

यांत आपल्या पक्षाच्या निवडणूक चिन्हाची दिशा बदलण्यात यावी असं म्हटलं होतं. त्यानुसार निवडणूक आयोगानं राज यांची ही मागणी मान्य करत सुधारीत चिन्ह पाठवलं आहे. याआधी २००७ साली झालेल्या निवडणुकीत मनसेच्या सर्व उमेदवारांनी रेल्वे इंजिन या चिन्हावर महापालिका निवडणूक लढवली होती. त्यानंतर २००९ साली एकच चिन्ह न मिळाल्यानं मनसेच्या उमेदवारांनी वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवली होती.

 

मात्र विधानसभा निवडणुकांमध्ये मनसेच्य़ा सर्व उमेदवारांनी रेल्वे इंजिन या चिन्हावर निवडणूक लढवली. लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत मिळालेल्या मतांच्या आधारे मनसेला निवडणूक आयोगानं अधिकृत प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता दिली. तसंच रेल्वे इंजिन हे कायमस्वरुपी निवडणूक चिन्ह दिलं.