माणसाचे प्राण वाचविण्यासाठी पोलिसाने मारली पुलावरून उडी

नाशिक येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात एका पोलिस शिपायाची कर्तव्यदक्षता आणि समयसूचकता दिसली. नदीत उडी घेतलेल्या माणसाला वाचविण्यासाठी एका पोलिस शिपायाने कोणताही विचार न करता २० फूट उंच पुलावरून नदीत उडी घेतली. 

Updated: Sep 15, 2015, 06:41 PM IST

नाशिक :  नाशिक येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात एका पोलिस शिपायाची कर्तव्यदक्षता आणि समयसूचकता दिसली. नदीत उडी घेतलेल्या माणसाला वाचविण्यासाठी एका पोलिस शिपायाने कोणताही विचार न करता २० फूट उंच पुलावरून नदीत उडी घेतली. 

मनोज बारहाते असे या पोलिस शिपायाचे नाव असून नाशिकच्या कुंभमेळ्यात बंदोबस्तात त्याची पोस्टिंग झाली आहे. त्यांनी केलेल्या कारनाम्यामुळे आता सर्व स्तरातून त्यांची प्रशंसा होत आहे. एका व्यक्तीने नदीत उडी घेतली असताना मनोज यांनी पाहिले, त्यांनी कोणताही विचार न करता उडी घेतली. 

२४ वर्षीय पोलीस शिपाई अमरधाम पुलावर गस्त घातल होते. त्यांनी पाहिले की एका माणूस पुलावरून उडी मारण्याचा प्रयत्न होता. मनोज यांच्या सहकाऱ्यांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला पण त्यांने उडी मारली. कोणताही विचार न करता आणि आपल्या जीवाची परवा न करता त्याला वाचविण्यासाठी मनोज यांनी २० फूट उंचावरून उडी मारली. 

 मनोज हे ट्रेनी पोलिस कॉन्स्टेबल आहेत. कोणताही पर्याय नसल्याचे मनोज यांनी सांगितले. त्या माणसाचे प्राण वाचवायचे होते, यामुळेच मी उडी घेतली. तो जर पुलाच्या खाली गेला असता तर त्याचे प्राण गेले असते असे मनोज यांनी सांगितले. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.