बँकेत खाते नसतानाही मिळाली दोन एटीएम कार्ड

बँकेत खाते नसताना बँक तुमच्या नावे एटीएम कार्ड देईल का ? यावर कोणी विश्वास ठेवणार नाही मात्र मालेगावच्या एका यंत्रमाग कामगाराला त्याचे नावे बँकेत कुठलेही खाते नसताना स्टेट बँक ऑफ इंडियाने त्याला चक्क दोन एटीएम कार्ड पोस्टाने पाठविलीत. 

Updated: Feb 13, 2017, 08:50 AM IST
बँकेत खाते नसतानाही मिळाली दोन एटीएम कार्ड title=

मालेगाव : बँकेत खाते नसताना बँक तुमच्या नावे एटीएम कार्ड देईल का ? यावर कोणी विश्वास ठेवणार नाही मात्र मालेगावच्या एका यंत्रमाग कामगाराला त्याचे नावे बँकेत कुठलेही खाते नसताना स्टेट बँक ऑफ इंडियाने त्याला चक्क दोन एटीएम कार्ड पोस्टाने पाठविलीत. 

अशपाक  अहमद मोहंमद  अली मोमीन असं या कामगाराचं नाव आहे.. यंत्रमाग  चालवून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्या नावे कुठल्याही बँकेत खाते नाही तसंच बँकेत खातं उघडण्यासाठी त्यांनी कुणालाही कागदपत्रेहि दिले नाहीत. 

मात्र तरीही स्टेट बँकेने त्यांच्या नावाचे दोन एटीएम कार्ड त्यांच्या राहत्या घराच्या पत्त्यावर पोस्टाने पाठवून दिले.