सकल मराठा समाजानं मुख्यमंत्र्यांच्या सभेत फलक झळकावले

लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रविवारी लातूरमध्ये सभा झाली. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 12, 2017, 11:22 PM IST
सकल मराठा समाजानं मुख्यमंत्र्यांच्या सभेत फलक झळकावले title=

लातूर : लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रविवारी लातूरमध्ये सभा झाली. 

टाऊन हॉल मैदानावर झालेल्या या सभेत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्यावतीनं मुख्यमंत्र्यांच्या सभेत फलक झळकावण्यात आले. 

यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करून मुख्यमंत्र्यांच्या भाषणात व्यत्यय आणला. तेव्हा पोलिसांनी ९ आंदोलकांना ताब्यात घेऊन त्यांना लातूरच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नेलं.