धुळे : दसऱ्याच्या मुहूर्तावर खान्देशात थंडीची चाहूल लागलीये. ऑक्टोंबरच्या सुरवातीलाच पाऊस पडला आणि आता थंडीची चाहूल लागायला सुरवात झालीये.
धुळे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अनेक भागांमध्ये दाट धुकं अनुभवायला मिळत आहे. धुळे शहर तर धुक्याच्या दुलईत अक्षरशः झाकोळलं जात आहे. अवघ्या ५० फुटांवरही काही दिसत नाही अशी स्थिती आहे.
पांझरा नदीकाठी तर नदीच्या वाहत्या पाण्यातून बाष्प बाहेर पडत असल्याचं चित्र आहे. हे दृश्य अनेकांना सुखावणार ठरत असून सकाळी सकाळी या धुक्याचा आनंदही धुळेकर घेत आहेत.
काही जण सकाळचा हा नजारा कॅम-यात बंदीस्त करत आहेत. काही उत्साही सेल्फी काढतायेत. दाट धुके एक वेगळीच अनुभूती देणारे असले तरी काही जेष्ठ नागरिकांना या धुक्यामुळे श्वसनाला त्रास जाणवत होता.
वाहनचालकांनाही वाहन चालवताना अडचण येत होती. हे दाट धुके धुळेकरांनी सकाळी आठ वाजेपर्यन्त अनुभवले