धुळे : धुळे परिवहन विभागात अनेक आमूलाग्र बदल केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून धुळे विभागातल्या ९०० एस टी बसमध्ये वाय फाय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील एसटी बसगाड्यांमध्ये प्रवाशांना ही सुविधा मिळणार आहे.
प्रवासी वाढावेत आणि त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी, आगारातल्या सर्व बसमध्ये वायफाय सुविधा पुरवण्याचं काम सुरु झालं आहे. प्रवासी या बसमध्ये उत्तम दर्जाच्या इंटरनेटचा आनंद घेऊ शकणार आहेत. ज्या क्रमांकाची बस असेल तोच वायफायचा कोड ठेवण्यात येणार आहे.