दुर्दैवी घटना: बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची भिंत कोसळल्यानं तरुणीचा मृत्यू

कल्याणमध्ये एक भिंत कोसळून एका तरुणीचा मृत्यू झालाय. बिर्ला कॉलेज आणि आरटीओजवळ असलेल्या सह्याद्रीनगरमध्ये ही घटना घडलीये. वीणा गानिगा असं या तरुणीचं नाव आहे. 

Updated: Nov 19, 2015, 04:52 PM IST
दुर्दैवी घटना: बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची भिंत कोसळल्यानं तरुणीचा मृत्यू title=

कल्याण: कल्याणमध्ये एक भिंत कोसळून एका तरुणीचा मृत्यू झालाय. बिर्ला कॉलेज आणि आरटीओजवळ असलेल्या सह्याद्रीनगरमध्ये ही घटना घडलीये. वीणा गानिगा असं या तरुणीचं नाव आहे. 

बांधकाम सुरु असलेल्या त्रिवेणी लोरीयल इमारतीची कम्पाउंड वॉल कोसळून हा अपघात झालाय. ढिगारा उपसण्याचं काम सुरू असून त्याखाली आणखी काही जण अडकले असल्याची शक्यता आहे. बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचा स्थानिकांचा आरोप असून बिल्डरविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

विशेष म्हणजे या इमारतीजवळच असलेली शाळा सुट्टीमुळे बंद असल्यामुळे मोठी हानी टळलीये. घटना घडून दोन तास उलटल्यावरही एकही सरकारी अधिकारी या ठिकाणी पोहोचला नव्हता.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.