शहीद संतोष महाडिक अनंतात विलीन, मुलानं दिला मुखाग्नी

जम्मू-काश्मीरमधल्या कुपवाड्यात दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या कर्नल संतोष महाडिक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोगरवाडी या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार झाले. महाडीक यांच्या पुत्रानं मुखाग्नी दिला. 

Updated: Nov 19, 2015, 01:09 PM IST
शहीद संतोष महाडिक अनंतात विलीन, मुलानं दिला मुखाग्नी title=

पोगरवाडी, सातारा: जम्मू-काश्मीरमधल्या कुपवाड्यात दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या कर्नल संतोष महाडिक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोगरवाडी या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार झाले. महाडीक यांच्या पुत्रानं मुखाग्नी दिला. 

वीरपुत्राला अखेरचा सलाम करण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो नागरिक यावेळी उपस्थित होते. पोगरवाडीत जनसागर लोटला होता. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर, मंत्री एकनाथ शिंदे, विजय शिवतारेही उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना अश्रू अनावर झाले होते. कर्नल महाडीक अमर रहे... वंदे मातरमच्या घोषणात परीसर दुमदुमन निघाला. ग्रामस्थांची छाती अभिमानानं भरुन आली होती. 

आणखी वाचा - पोगरवाडीत शोकाकुल वातावरण... लष्करी इतमामात #अखेरचानिरोप

दरम्यान आरे या त्यांच्या आजोळगावी काही काळ पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. राज्यातील अनेक आजी-माजी लष्करी अधिकारी उपस्थित होते. 

मंगळवारी दुपारी काश्मिरमध्ये मनिगाहच्या जंगलात दहशवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाडीक हे गंभीर जखमी झाले होते. लष्करी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांना वीरमरण आलं. शुक्रवारपासून जंगलात दडून बसलेल्या घुसखोरांविरोधात त्यांच्या नेतृत्वाखाली कारवाई सुरू होती. कर्नल महाडिक हे सीमेवरील दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी नेहमीच अग्रेसर होते, अशा शब्दांत लष्करानं त्यांना आदरांजली वाहिली आहे.. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.