आता, तुमची मतं प्रिंट स्वरुपातही दिसणार!

महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज्यात १३ ठिकाणी ‘व्हीव्हीपीएटी’ म्हणजेच ‘वोटर व्हेरीफिकेशन पेपर ऑडिट ट्रायल’ प्रणाली वापरण्यात येणार आहे.

Updated: Sep 13, 2014, 11:24 AM IST
आता, तुमची मतं प्रिंट स्वरुपातही दिसणार! title=

औरंगाबाद : महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज्यात १३ ठिकाणी ‘व्हीव्हीपीएटी’ म्हणजेच ‘वोटर व्हेरीफिकेशन पेपर ऑडिट ट्रायल’ प्रणाली वापरण्यात येणार आहे.

या प्रणालीत एव्हीईएम मशीनच्या बाजूलाच ही प्रणाली बसवणार असून, आपलं मत नोंदवल्यानंतर बाजूला असलेल्या या प्रिंटरवर मतदाराला आपण नोंदवलेलं मत १५ सेकंद दिसेल. 

त्यानंतर मतदात्यानं नोंदवलेलं आणि कागदावर प्रिंट झालेलं हे मत प्रिंटरलाच जोडलेल्या एका बॉक्समध्ये पडेल. ही मतं प्रिंट स्वरुपात चार वर्षापर्यंत ठेवण्याची व्यवस्था असणार आहे. 

एखाद्या ‘ईव्हीएम’मशीनमध्ये खराबी आढळल्यास छापील स्वरुपात असलेले मतदान निकाल स्वरुपात वापरण्यात येतील.

औरंगाबादमध्ये तीन ठिकाणी मतदार संघात ही प्रणाली वापरण्यात येणार आहे. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात या मतदान प्रणालीचा डेमो देण्यात आला. 

पाहुयात, नेमकी काय आहे ही ‘व्हीव्हीपीएटी’ प्रणाली काय आहे ते…

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.