पुणे : पुणे शहरामधील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आता तर ही संख्या पुण्याच्या लोकसंख्येइतकी झाली आहे. पुणे महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या सद्यस्थिती अहवालातून हे वास्तव समोर आलं आहे.
जनगणनेनुसार पुण्याची लोकसंख्या 31 लाखांच्यावर आहे. तर अहवालातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार पुण्यातील वाहनांच्या संख्येनंही 31 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. पुण्यातील वाहनांमध्ये दरवर्षी सरासरी दोन लाख वाहनांची भर पडत आहे.
या अहवालानुसार सन 2013 -14 मध्ये पुण्यात 26 लाख 66 हजार 488 वाहनांची नोंद झाली होती. हीच संख्या 2014-15 मध्ये 28 लाख 70 हजार 281 एवढी झाली. यंदा तर वाहनांच्या संख्येनं 31 लाखांचा टप्पा पार केला आहे.