व्हॅलेंटाईन डेला विरोध करत विश्व हिंदू परिषद कार्यकर्त्यांचा धिंगाणा

व्हॅलेंटाईन डेला विरोध करत ठाण्यात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी धिंगाणा घातला. व्हॅलेंटाईन डेच्या वस्तू दुकानातून काढून रस्त्यावर जाळल्या. विश्व हिंदू परिषदेच्या १५ कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला. नौपाडा परिसरात हा प्रकार घडला.

Updated: Feb 14, 2015, 11:11 PM IST
व्हॅलेंटाईन डेला विरोध करत विश्व हिंदू परिषद कार्यकर्त्यांचा धिंगाणा title=

ठाणे : व्हॅलेंटाईन डेला विरोध करत ठाण्यात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी धिंगाणा घातला. व्हॅलेंटाईन डेच्या वस्तू दुकानातून काढून रस्त्यावर जाळल्या. विश्व हिंदू परिषदेच्या १५ कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला. नौपाडा परिसरात हा प्रकार घडला.

पाश्चिमात्य संस्कृतीचा निषेध करत कार्यकर्त्यांनी भेटकार्डची होळी केली. आज मातृ-पितृ दिवस असताना शहिदांच्या स्मृती दिनाच्या आठवणी जागवाव्यात, असं आवाहन आंदोलनकर्त्यांनी केलं. तर काल नागपूरमध्ये विद्यार्थीसेनेच्या कार्यकर्त्यांनी तरुण-तरुणींचा मारहाण करत उठाबशा काढण्यास भाग पाडले होते. याची निंदा करण्यात येत असताना आज ठाण्यात असाच प्रकार घडल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

दरम्यान, दुसरीकडे ठाण्यातील वामनराव ओक रक्तपेढीनं व्हेलेंटाईन डे निमित्त विशेष कार्यकम आयोजीत केला होता. 'रक्ताचा थेंब सर्वांसाठी...क्षण प्रेमाचा जीवलगासाठी' या संकल्पनेवर आधारित रक्तदान जागृतीचा अभिनव उपक्रम राबवला. यामध्ये जवळपास ४५ युवकांनी रक्तदान केलंय. रक्तदान करणा-या इच्छुकांच्या नावांची यादी एका वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे. या उपक्रमाचं नागरिकांनी स्वागत केलंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.