व्हॅलेंटाईन डेलाच प्रेमास नकार, प्रेमीच्या घरीच तरुणीची आत्महत्या

व्हॅलेंटाई डे. आजचा प्रेमाचा दिवस. हा दिवस तरुण-तरुणी मोठ्या उत्साहात साजरा करतात. मात्र, आजच्या या प्रेमाच्या दिवसाला गालबोट लागले आहे. व्हॅलेंटाईन डेलाच आपल्या प्रेमास नकार दिल्याने प्रेमीच्या घरीच एका तरुणीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आज समोर आलाय.

Updated: Feb 14, 2015, 06:12 PM IST
व्हॅलेंटाईन डेलाच प्रेमास नकार, प्रेमीच्या घरीच तरुणीची आत्महत्या title=

बीड : व्हॅलेंटाई डे. आजचा प्रेमाचा दिवस. हा दिवस तरुण-तरुणी मोठ्या उत्साहात साजरा करतात. मात्र, आजच्या या प्रेमाच्या दिवसाला गालबोट लागले आहे. व्हॅलेंटाईन डेलाच आपल्या प्रेमास नकार दिल्याने प्रेमीच्या घरीच एका तरुणीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आज समोर आलाय.

आज सर्व जग प्रेमाचा दिवस साजरा करण्यात मग्न असताना बीडमधील माजलगाव येथे एका तरुणीनीने प्रेमीच्या घरी जाऊन आत्महत्या केली.  शालिनी (बदललेले नाव) हीने  तिला आवडणाऱ्या प्रेमीच्या घरी गेली. आज १४ फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन दिवस निवडला आणि प्रेपोज करत लग्नाची मागणी घातली. 

मात्र, त्याने त्या तरुणीचे प्रेम नाकारले. त्याला तिने समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने प्रेमाला नकार कायम ठेवला. त्याचवेळी शालिनीने प्रेमीच्यासमोर विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

हे दोघेही सरकारी नोकर आहेत. माजलगाव तहसीलमधील कालिकानगर येथे ही घटना घडल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.