टंचाईग्रस्त भागात पाणी पिण्यासाठीच वापरा, सरकारच्या सूचना

राज्यातल्या धरणांचा पाणीसाठी खालावत चालल्यामुळं टंचाई असलेल्या भागातलं पाणी केवळ पिण्यासाठीच वापरण्याच्या निर्णय राज्य सरकारनं घेतालाय. यासंदर्भात राज्य सरकारनं जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. 

Updated: Aug 13, 2015, 10:38 PM IST
टंचाईग्रस्त भागात पाणी पिण्यासाठीच वापरा, सरकारच्या सूचना title=

दिपक भातुसे, झी मीडिया, मुंबई: राज्यातल्या धरणांचा पाणीसाठी खालावत चालल्यामुळं टंचाई असलेल्या भागातलं पाणी केवळ पिण्यासाठीच वापरण्याच्या निर्णय राज्य सरकारनं घेतालाय. यासंदर्भात राज्य सरकारनं जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. 

राज्यातल्या जलाशयांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाल्यानंतर शेती आणि उद्योगाला पाणी पुरवण्यात येणार असल्याचंही सरकारनं नमूद केलंय. 

विशेष करून ही सूचना मराठवाड्यात देण्यात आलीय. कारण आताच्या घडीला फक्त ७ टक्के पाणीसाठा मराठवाड्यात आहे. पावसाचा अनुशेष विदर्भात तर गेल्या काही दिवसांत भरून निघाला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि राज्याच्या इतर भागात मराठवाडा एवढी आणीबाणीची परिस्थिती नाहिये. 

मराठवाड्यात लातूर, उस्मानाबाद आणि बीडमध्ये भीषण परिस्थिति आहे. पावसाचं भाकित लक्षात घेता उरलेल्या दोन महिन्यात सरासरी पाऊस गाठेल, असं दिसत नाहिये. म्हणूनच भीषण टंचाई असलेल्या भागात फक्त पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाऊस पडल्यावर - पुरेसा साठा झाल्यावर ( सुमारे 33 %) झाल्यावर पिण्याच्या वापराबरोबर शेती आणि मग उदयोग असं प्राधान्य क्रम देण्यात येणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.