'हिंदूंच्या सणांवर निर्बंध कशासाठी?'

दहीहंडीवर सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध आणल्यानंतर आता राज्यात राजकीय वाद निर्माण झाला आहे.

Updated: Aug 20, 2016, 01:55 PM IST
'हिंदूंच्या सणांवर निर्बंध कशासाठी?' title=

मुंबई : दहीहंडीवर सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध आणल्यानंतर आता राज्यात राजकीय वाद निर्माण झाला आहे. मनसेनंतर आता शिवसेनेनंही या वादात उडी घेतली आहे. हिंदूंच्या सणांवरच निर्बंध कशासाठी असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. उत्सव हा उत्सवासारखाच साजरा व्हावा, गोविंदा पथकं आणि दहीहंडी मंडळांनी काळजी घेऊन उत्सव साजरा करावा असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. 

याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही दहीहंडीच्या वादावरून काही प्रश्न उपस्थित केले होते. दहीहंडीची मर्यादा 20 फुटावर आणली, आता काय स्टुलावरुन हंडी फोडायची का? मराठी सण असले की निर्णय घेतले जातात. अन्य सणांसाठी मुभा का? असे प्रश्न राज ठाकरेंनी विचारले होते.