मुंबईतल्या खड्ड्यांच्या राजकारणाचा बदला नागपुरात

नागपुरात रस्त्यांची अवस्था वाईट आहे, कंत्राटदारांनी दर्जाहीन काम करुन नागपूर महापालिकेला कोट्यवधी रुपयांना लुबाडलं आहे

Updated: Aug 20, 2016, 12:54 PM IST
मुंबईतल्या खड्ड्यांच्या राजकारणाचा बदला नागपुरात  title=

नागपूर : नागपुरात रस्त्यांची अवस्था वाईट आहे, कंत्राटदारांनी दर्जाहीन काम करुन नागपूर महापालिकेला कोट्यवधी रुपयांना लुबाडलं आहे, त्यामुळे अशा बोगस कामांची चौकशी करावी आणि दोषी कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी शिवसेनेनं केली आहे. 

मुंबईतल्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांचा विषय घेत भाजपनं मुंबईत शिवसेनेची कोंडी केली आहे, त्याचं उट्टं काढण्याकरता शिवसेनेनं थेट नागपुरात जाऊन तिथल्या रस्तेकामाचे वाभाडे काढले. 

शिवसेनेचे नागपूर प्रभारी आणि विधान परिषदेचे आमदार अनिल परब यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेऊन, भाजपच्या नेतृत्वातल्या महापालिकेच्या कामांवर अशा प्रकारे हल्लबोल केला. भाजपने ऑरेंज सिटी वॉटर वर्क्स या खाजगी कंपनीच्या माध्यमातून नागपूरकरांना २४ तास पाणी देण्याचे स्वप्न दाखवलं. अनेक भागांत आजही एक दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याचा आरोपही अनिल परब यांनी यावेळी केला.