लातूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दुष्काळग्रस्त लातूरच्या दौऱ्यावर आहेत. शेतकरी संकटात असल्यानं राज्य आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी अशी मागणी यावेळी उद्धव ठाकरेंनी केली.
लातूरचं 70 लाख लीटर पाणी मुरतंय कुठे? असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला. सरकारी योजना जाहीर होतात पण जनतेला त्याचा लाभ मिळाला नाही, जिथे असे प्रकार सुरु असतील, तिथे शिवसैनिकांनी लक्ष घालावं असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.
उद्धव ठाकरेंच्या हस्ते लातूरमध्ये ५० नवीन टँकरही सुरू करण्यात आले. यावेळी खासदार चंद्रकांत खैरे, रवींद्र गायकवाड, नीलम गोऱ्हे यांचीही उपस्थिती होती.