मुंबई : आत्ता 63 आमदार घेऊन आलोय पण लवकरच 180 आमदार घेऊन दर्शनाला येईन... अशी प्रतिज्ञाच उद्धव ठाकरेंनी एकवीरादेवीसमोर केलीय. त्यामुळे नक्की उद्धव ठाकरेंच्या मनात काय विचार सुरू आहेत? याबद्दलच्या चर्चांना उधाण आलंय.
महाराष्ट्रात रयतेचं राज्य आणून दाखवणार, असं वक्तव्यही त्यांनी यावेळी केलं. .यामुळं मात्र भाजप सरकारमध्ये सामील होण्याबाबत संभ्रम वाढल्याचं दिसतंय. शिवसेनेनं उपमुख्यमंत्रिपदासह मंत्रिमंडळात एक तृतिअंश वाटा मागितलाय. मात्र भाजपला शिवसेनेची मागणी मान्य नाही त्यामुळं सत्तेत सहभागी होण्याबाबतचा तिढा वाढला आहे. आता उद्धव ठाकरेंनी कार्ल्यात वक्तव्य केल्यामुळं युतीबाबत संभ्रमाची स्थिती कायम आहे.
ठाकरे घराण्याचं कुलदैवत असलेल्या कार्ल्याच्या एकवीरा देवीचं निवडणुकीनंतर दर्शन घेण्याची परंपरा शिवसेनेनं कायम ठेवलीय. मुंबई-पुणे मार्गावर लोणावळ्यापासून ११ किमी अंतरावर असलेला कार्ल्याच्या डोंगर पायऱ्यांनी चढून एकवीरा देवीच्या दर्शनासाठी जावं लागतं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या विजयी 63 आमदारांना घेऊन कार्ल्यामध्ये जाऊन एकवीरा आईचं दर्शन घेतलं.
भाजपबरोबर सत्तास्थापनेत सहभागी व्हायचं किंवा नाही? याबद्दलचा निर्णय एकवीरेच्या दर्शनानंतर उद्धव ठाकरे घेतील अशी चिन्हं आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.