दोन वर्षे झाली तरी नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी मोकाट

डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला दोन वर्ष पूर्ण झाली तरी मारेकरी मोकाटच आहेत. सीबीआयकडे तपास देऊनही तपासात प्रगती नाही. सरकारला आरोपी माहिती असल्याचा दाभोलकर कुटुंबीयांचा आरोप आहे.

Updated: Aug 20, 2015, 01:02 PM IST
दोन वर्षे झाली तरी नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी मोकाट title=

पुणे : डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला दोन वर्ष पूर्ण झाली तरी मारेकरी मोकाटच आहेत. सीबीआयकडे तपास देऊनही तपासात प्रगती नाही. सरकारला आरोपी माहिती असल्याचा दाभोलकर कुटुंबीयांचा आरोप आहे.

डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. दाभोलकरांचे मारेकरी मात्र अदयाप सापडलेले नाहीत. पुणे पोलीस त्यानंतर आता सीबीआयकडे हा तपास आहे. तपासातील प्रगती मात्र जैसे थेच आहे. 

सरकारला आरोपी माहित आहेत. पण त्यांना पकडलं जात नाही, असा थेट आरोप दाभोलकर कुटुबीयांनी अनेकदा केला आहे. २० ऑगस्ट २०१३ ला नरेंद्र दाभोलकरांची पुण्यातील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर हत्या झाली. सुरुवातीला पुणे पोलिसांच्या २० हून अधिक टीम दाभोलकर हत्येचा तपास करत होत्या. मात्र, तपास शून्य आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.