आश्रम शाळेतील २ विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू

. जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील गोठणगाव इथल्या आश्रम शाळेतील मित्राला भेटण्यासाठी भरधाव वेगाने एकाच वाहनावर निघालेले होते.  

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 27, 2017, 07:52 PM IST
आश्रम शाळेतील २ विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू title=

गोंदीया : गोंदिया जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला आहे. जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील गोठणगाव इथल्या आश्रम शाळेतील मित्राला भेटण्यासाठी भरधाव वेगाने एकाच वाहनावर निघालेले होते.  

या विद्यार्थ्यांच्या मोटरसायकलने ट्रकला ओव्हरटेक करत असताना तोल गेला आणि हा अपघात झाला.ट्रकच्या चाकाखाली आल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यातला एक विद्यार्थी बाजूला पडल्यामुळे गंभीर जखमी झाला.