भारतात पहिल्यांदा दोन महिलांना दिली जाईल फाशी

भारतात असं पहिल्यांदा होणार आहे की, दोन महिलांना फाशी दिली जाणार आहे. शनिवारनंतर कधीही त्यांना फाशी दिली जावू शकते. या दोन महिलांवर 13 मुलांचं अपहरण आणि त्यातील 9 जणांची हत्या केल्याचा आरोप आहे. 

Updated: Aug 14, 2014, 06:02 PM IST
भारतात पहिल्यांदा दोन महिलांना दिली जाईल फाशी title=

कोल्हापूर: भारतात असं पहिल्यांदा होणार आहे की, दोन महिलांना फाशी दिली जाणार आहे. शनिवारनंतर कधीही त्यांना फाशी दिली जावू शकते. या दोन महिलांवर 13 मुलांचं अपहरण आणि त्यातील 9 जणांची हत्या केल्याचा आरोप आहे. 

एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गेल्या महिन्यातच त्यांची दया याचिका फेटाळून लावलीय. यानंतर आता सरकारी कारवाईची प्रक्रिया पुढे जातेय. ही सर्व प्रक्रिया शनिवारी संपेल. 

कोल्हापूरच्या या दोन महिला बहिणी आहेत. रेणुका शिंदे आणि सीमा गावित या बहिणींनी आपली आई अंजनाबाई गावितसोबत मिळून लहान मुलांचं अपहरण केलं आणि भीक मागण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला. 

जेव्हा त्यातल्या काही मुलांनी भीक मागण्यास नकार दिला तेव्हा या दोघींनी मुलांची निर्घृण हत्या केली. पोलिसांनी त्या तिघींना अटक केली. आई अंजनाबाईचा ट्रायल दरम्यानच येरवडा तुरुंगात मृत्यू झाला. न्यायाधिशांनी दोषी महिलांच्या वडिलांना सोडून दिलंय. तर या दोन दोषी महिलांना फाशी सुनावलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.