कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात तृप्ती देसाईंचा प्रवेशाचा स्टंट

अंबाबाई मंदिरात तृप्ती देसाईंनी प्रवेशाचा स्टंट सुरू केला. मात्र त्यांना मंदिरात प्रवेश करण्यात यश आलं नाही. 

Updated: Apr 13, 2016, 06:34 PM IST
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात तृप्ती देसाईंचा प्रवेशाचा स्टंट  title=

कोल्हापूर : अंबाबाई मंदिरात तृप्ती देसाईंनी प्रवेशाचा स्टंट सुरू केला. मात्र त्यांना मंदिरात प्रवेश करण्यात यश आलं नाही. 

जमावबंदीचा आदेश मोडल्यामुळे तृप्ती देसाईंना ताब्यात घेतलंय. चार-चार व्यक्ती जाऊन देण्यास काय हरकत आहे, असा सवालही उपस्थित करण्यात आला. मंदिरापासून दीड किलोमीटरवर असलेल्या तावडे हॉटेलजवळ त्यांना पोलिसांनी अडवलं. 

हिंदू समितीचे कार्यकर्ते अगोदरपासूनच मंदिर परिसरात हजर होते. आणि तृप्ती देसाईंना रोखण्यासाठी मंदिरात ठाण मांडून बसले होते. मात्र पोलिसांनी या दोन्ही गटांना आमनेसामने येऊ न देता परिस्थिती हाताळली. अंबाबाई मंदिर परिसरातली दुकानं आज बंद ठेवण्यात आली होती. 

दरम्यान, त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभा-यात प्रवेश करण्यासाठी स्वराज्य महिला संघटनेच्या महिला दाखल झाल्यात. मात्र त्यांना गाभा-यात प्रवेश करायला ट्रस्टनं मज्जाव केलाय.