पेशवेकालीन परंपरेसाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान जाणार सुप्रीम कोर्टात

महिलांना मंदिर प्रवेशापासून अडवू नये, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिल्यानं सर्वांच्या नजरा पुन्हा एकद शनी शिंगणापूरनंतर त्रंबकेश्वर मंदिराकडे लागल्यात. मंदिराच्या गर्भगृहात महिलांना प्रवेश न देण्याची पेशवेकालीन परंपरा या पुढेही सुरु ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्धार देवस्थान ट्रस्टने घेतलाय.

Updated: Apr 2, 2016, 07:53 PM IST
पेशवेकालीन परंपरेसाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान जाणार सुप्रीम कोर्टात title=

मुकुल कुलकर्णी, नाशिक : महिलांना मंदिर प्रवेशापासून अडवू नये, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिल्यानं सर्वांच्या नजरा पुन्हा एकद शनी शिंगणापूरनंतर त्रंबकेश्वर मंदिराकडे लागल्यात. मंदिराच्या गर्भगृहात महिलांना प्रवेश न देण्याची पेशवेकालीन परंपरा या पुढेही सुरु ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्धार देवस्थान ट्रस्टने घेतलाय.
 
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या त्र्यंबकेश्वर मंदिरात महिलांना प्रवेश असला तरी ब्रह्मा विष्णू महेशाचं जागृत स्थान असणाऱ्या याच गर्भगृहात महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी भूमाता ब्रिगेडनं हट्ट धरलाय. यासाठी भूमाता ब्रिगेडने एकदोन वेळा मंदिर प्रवेशाचा प्रयत्नही केला, मात्र दोन्ही वेळा तो अपयशी ठरला. धार्मिक भावनेशी निगडीत या लढ्याला आता महिला विरोधी महिला असं स्वरूप प्राप्त झालंय. मंदिरात महिलांना प्रवेश दिला जावा असा निर्णय उच्च न्यायालयाने दिल्यानं भूमाता ब्रिगेड अधिकच आक्रमक झालीय. 

तर दुसरीकडे शनिशिंगणापूर पाठोपाठ त्रंबकेश्वर देवस्थान ट्रस्टनं उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याच्या निर्धार केल्याचं त्र्यंबकेश्वरच्या विश्वस्त ललिता शिंदे यांनी म्हटलंय. 

देवस्थान ट्रस्टच्या न्यायालयीन लढाईला पुरोहित संघाचाही पाठिंबा आहे. मंदिराच्या गर्भगृहात महिलांना प्रवेश न देण्याची ही पेशवेकालीन परंपरा आहे त्यामुळे यापुढे ती पाळली जावी, अशी अपेक्षा पुरोहित संघाकडून व्यक्त केली जातेय.

मंदिर प्रवेशाच्या वादामुळे वातावरण दूषित होतंय. त्यामुळे दोन्ही बाजूंनी सामोपचारानं वाद मिटवावा आणि महिलांचाही सन्मान राखला जावा, अशी मागणी सर्वसामान्य भाविकांकडून केली जातेय.